गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

केसांचे आरोग्य राखा

ND
पौष्टिक आहार फक्त शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठीही गरजेचा आहे. केस हे आरोग्याच्या प्रत्येक तक्रारीची माहिती देतात. केस जास्त प्रमाणात गळत असतील, पातळ झाले असतील किंवा डोक्याच्या त्वचेसंबंधित कुठलीही तक्रार असेल तर समजून घ्या तुमचे आरोग्य बरोबर नाही. केसांचे स्वास्थ्य जपण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे पौष्टिक आहार. प्रथिने, दूध-दही, हिरव्या पालेभाज्या, फळं, सलाड इत्यादी पदार्थ आहारात नित्याने घ्यावे.

दिवसातून कमीत कमी 12 ते 14 ग्लास पाणी प्यायला हवे.
केसांना स्वस्थ राखण्यासाठी अक्रोड व बदाम खा.
रोजच्या दिनचर्येत व्यायाम गरजेचा आहे. मग दोरीवरच्या उड्या मारा किंवा डान्स करा.
मानसिक तणावामुळे केसांवर विपरीत परिणाम पडतो. तणाव दूर करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान करा.