शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

गर्भारपणात झोप आवश्क

स्त्री गर्भवती राहिल्यांनतर तिला पुरेशी झोप मिळाली पाहिजे. गर्भारपणात स्त्रीची झोप अपूर्ण राहात असेल किंवा तिला झोप येत नसेल तर, त्याचा स्त्रीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि त्यामुळे प्रसूतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

आमच्या संशोधनानुसार स्त्री गर्भवती असताना तिला पुरेशी झोप मिळाली पाहिजे असे पीटरबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठाचे मुख्य संशोधक मायकल ओकुन यांनी सांगितले. स्त्री गर्भवती राहिल्यानंतर, सुरुवातीलाच निद्रानाशाची समस्या समजली तर, त्यावर डॉक्टर वेळीच उपाय करू शकतात, असे ओकुन म्हणाले. झोपेचा आणि गर्भारपणाचा महत्त्वाचा संबंध आहे, असे ओकुन यांनी सांगितले. झोप अपूर्ण राहात असेल तर शरीरात साटोकानेसचे प्रमाण वाढते. साटोकानेसही गर्भारपणात आवश्यक आहे, मात्र त्याचे प्रमाण वाढले तर, ते निरोगी पेशी नष्ट करते. त्यामुळे गर्भारवस्थेत अन् आजार होण्याचा धोका वाढतो.