शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जर रात्री खायचं असेल दही...

अधिकश्या लोकांप्रमाणे रात्री दही खाणे नुकसानदायक आहे. हे खरं आहे की रात्री दह्याचे सेवन केल्याने ताप, ऍनिमिया, जॉन्‍डिस, चक्‍कर येणे, रक्‍तपित्‍त आणि त्वचा संबंधी अॅलजी इत्यादीला सामोरा जावं लागू शकतं. कारण दही आंबट असून पचण्यात कठीण आणि शरीरात कफ आणि पित्त दोष उत्पन्न करणारं असतं.
 
रात्री दही खायला मनाही केली असल्यास रात्री दह्याचे सेवन टाळावे. परंतू आपल्या दही आवडतं आणि इतर काही त्रास नसल्यास आपण यात चिमूटभर काळी मिरं पावडर टाकून खाऊ शकता.
keri raita
आपण दह्यात मेथी पावडर मिसळूनही खाऊ शकता. याने पोट दुखी आणि अपचनासंबंधी तक्रार दूर होते.
 
रात्रीच्या वेळी दह्यात मध, तूप किंवा आवळा मिसळूही सेवन करू शकता. तसेच दह्याऐवजी ताक पिणे अधिक योग्य. याने कफाचा त्रास होण्याची शक्यता नसते.