गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जेवण केल्यानंतर हे कराच

जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. त्यामुळे दाताला कीड लागत नाही.या गुळण्या १0 ते १५ वेळा कराव्यात. शास्त्रानुसार गुळण्या १६ वेळा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे जर आपण १-२ वेळा गुळण्या केल्या तर आपल्या दातांमधील अडकलेले मोठे कणच निघतात. तेच आपण १0 ते १५ वेळा गुळण्या केल्या म्हणजेच कोपर्‍यांत अडकलेले कण बाहेर पडतात व तोंडाला दुर्गंधीही येत नाही. जेवणाच्या दरम्यान आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. गुळण्या केल्याने व डोळ्यांना पाणी लावल्याने उष्णता शांत होते. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कमीत क मी अध्र्या तासाने पाणी प्यावे. म्हणजेच पचनक्रिया 
व्यवस्थित होण्यास मदत होते.