शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

झटपट करा वजन कमी

जास्त कष्ट न घेता लवकर वजन कमी करायचे असेल तर या गोष्टी करा-
1. व्यायाम
* दररोज चाला. चालण्याच्या व्यायामात दम लागणे आणि घाम येणे आवश्यक आहे. रोज 4 किमी भराभर चालावे. चालताना पायात योग्य मापाची पादत्राणे घालावी.
* व्यायामासाठी बाहेर पडणे शक्य नसल्यास घरी 5 मिनिटे दंड-बैठका, 5 मिनिटे दोरीच्या उड्या, 5 मिनिटे सिट अप्स आणि 5 मिनिटे पायर्‍या चढ-उतर कराव्या.
* एकदा व्यायाम सुरू केल्यावर ते नियमित करणे हीच वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.

2. आहार
* लंचमध्ये एक ज्वारीची भाकरी आणि एक वाटी साधी भाजी घ्यावी.
* दुपारी कोणत्याही आवडत्या फळाचे पोटभरूनं सेवन करावे.
* रात्रीच्या जेवण्यात 1 ज्वारीची भाकरी आणि 2 वाटी मुगाचे किंवा तुरीचे वरण खायला पाहिजे.

3. आयुर्वेदिक औषध
* 2 ग्रॅम त्रिकटु चूर्ण सकाळी, दुपारी आणि रात्री एक चमचा मधामध्ये कालवून जेवण्यापूर्वी घ्यावे.
* रात्री जेवणानंतर 2 वाटी गरम पाण्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण कालवून घ्याला हवे.

या उपायाने महिन्याभरात 3 ते 4 किलो वजन सहज कमी होईल. आणि याचे पालनकरताना 1-2 वेळा वेळापत्रक चुकले तरी हरकत नाही.