शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 14 जुलै 2014 (12:11 IST)

बदाम खाण्याचे फायदे..

रात्रभर दुधात भिजवलेले किंवा पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याने स्मरणशक्ती स्ट्राँग होण्यास मदत होते, म्हणूनच सर्व डॉक्टर लहान मुलांना दररोज २ बदाम खायला सांगतात व ही गोष्ट सर्वसामान्यांनाही माहीत आहे.

बदामामध्ये १३ टक्के प्रथिने असतात. त्याने आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

२५ टक्के कॅल्शिअम आणि २0 टक्के लोह बदामात असते; जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असते.

४ वर्षापर्यंत बदाम सुरक्षित राहतात. फक्त ते हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावेत.

२0 अँण्टिऑक्सिडंट्स फ्लेव्हनॉइड्स बदामाच्या आवरणात असतात. त्यामुळे नियमित २-४ बदाम खाणे शरीरासाठी चांगले असते. कमजोरी दूर होते व तुम्हाला फ्रेश वाटते.