शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

मधुमेहाची लक्षणे काय?

सातत्याने लघवीची भावना होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, बरेचदा थकल्यासारखे वाटणे, त्वचा एकदम कोरडी होणे, जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे, नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत. याखेरीज मळमळल्यासारखे वाटणे, उलटीची भावना होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे जाणवू शकतात