शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (17:06 IST)

मनुष्याचे आजारी पडण्याची मुख्य कारणे!

* मनुष्य त्याच्या गरजेपेक्षा अधिक खातो, त्याने किती खाल्ले पाहिजे हे त्याला माहीत नसते.
 
* सर्व आहार कृत्रिम पदार्थाचा व प्रक्रिया केलेला असतो.
 
* नैसर्गिक स्वरूपात भाज्या व फळे खात नाही.
 
* भूक लागली नसतानाही मनुष्य खातो.
 
* अयोग्य मेळयुक्त पदार्थ खातात. उदा. दूध+केळ+साखर.
 
* मनुष्य चावून खात नाही. दातांकडून पूर्णपणे काम करून घेत नाही.
 
* आवश्कतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी पितात.
 
* योग्य तितके श्रम करत नाही. गरजेपेक्षा अधिक व चुकीच्या पद्धतीने श्रम करतात. 
 
* मोकळी हवा, सूर्यप्रकाश यांचा पूर्णपणे उपयोग करून घेत नाही.
 
* योग्यप्रकारे स्नान कसे करावे, हे मनुष्याला माहीत नाही.
 
* दीर्घश्वसन करत नाही. अस्वच्छ हवा व दूषित वातावरणात बराच काळ राहातात.
 
* व्यर्थ चिंता, काळज्या करून मन दु:खी ठेवतात. मानसिक ताणात वागतात.
 
* शारीरिक वा मानसिक शक्ती मोठय़ा प्रमाणात खर्च करतात.
 
* शांतपणे पूर्ण झोप घेत नाहीत. काही ना काही वाईट सवयी किंवा व्यसने असणे.