गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

मुलांसाठी रोज दोन कप गायीचे दूध पोषक

WD
आपल्याकडे गायीच्या दुधाचे महत्त्व प्राचीन काळापासूनच सांगितले जाते. आता पाश्चात्त्यांनाही ते कळू लागले आहे. येथील संशोधकांनी आता म्हटले आहे की, मुलांमधील 'ड' जीवनसत्व व लोहतत्वाचे योग्य प्रमाण राखण्यासाठी त्यांना रोज दोन कप गायीचे दूध देणे आवश्यक ठरते. अनेकांना मुलांना किती दूध द्यावे, असा प्रश्न पडलेला असतो, त्याचेही समाधान संशोधकांनी या निष्कर्षातून केले आहे. सेंट मिशेल्स हॉस्पिटलमधील डॉ. जॉनथन मॅग्युरी यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, व्यावसायकि दूध उत्पादन पालकांना अशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हते. अनेक लोक डॉक्टरांना याबाबतची पृच्छा करीत. आता आम्ही संशोधनाद्वारे हे दाखवले आहे की, मुलांना रोज दोन कप गायीचे दूध देणे त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. लोहतत्व आणि 'ड' जीवनसत्वाबाबत गायीचे दूध किती परिणामकारक ठरते हे आम्ही पाहिले आहे. दोन ते पाच वर्षे वयाच्या 1300 मुलांची यासाठी पाहणीही करण्यात आली. त्यामधून दुधाचे प्रमाणही निश्चि करण्यात आले. दोन कप दूध हे मुलांसाठी पुरेसे आहे असे त्यांनी म्हटले आहे.