गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

या 5 उपायाने दूर होईल गुडघेदुखी

1. एक लहान चमचा हळद पावडर, एक लहान चमचा साखर बुरा, किंवा मध, आणि एक चुटकी चुना हे सर्व पदार्थ आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट झोपण्यापूर्वी गुडघ्यावर लावावी. सकाळी धुऊन टाकावी. आराम मिळेल.

2. एक लहान चमचा सूंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळा. याची पेस्ट तयार करून दिवसातून दोनदा लावा. काही तासाने धुऊन टाका.

3. 5 बदाम, 5 काळी मिरी, 10 मनुका आणि 6 अक्रोड गरम दुधासोबत सेवन करावे. हा प्रयोग केल्याने आराम मिळेल.

4. एक कप पाण्यात 8 खजूर रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे खा. ज्या पाण्यात भिजवले असतील ते प्या.

5. नारळ गुडघेदुखीसाठी एक चांगली औषधी आहे. रोज नारळ खावे. नारळाचे दूध प्यावे. गुडघ्यावर दोनदा नारळाच्या तेलाने मालीश करावी.