शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय करा!

WD
नियंत्रणवाढत्या वजनावरवाढते वजन ही एक समस्या बनली आहे. कामाचे स्वरूप, वेळा, जेवणाची अनिश्‍चितता, फास्ट फूड अशा विविध कारणांनी वजन वाढत आहे. वाढत्या वजनाने अनेक आजारांना तोंड देण्याची वेळ आली आहे. वजन वाढते. खाणे-पिणे बंद करणे हा काही मार्ग नाही. याचे दुष्परिणामच जास्त होऊ शकतात. त्यामुळे काही पथ्य पाळा म्हणजे नक्कीच वजनावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

पुढे पहा न चुकता ब्रेकफास्ट करणे किती महत्त्वाचे.....


WD
न चुकता ब्रेकफास्ट हव

अनेक निरीक्षणांमधून हेच पुढे आलंय, की तुम्ही दररोज न चुकता ब्रेकफास्ट घेतलात तर तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता; पण काही जण कॅलरीज कमी करण्याच्या नादात ब्रेकफास्ट घेणंच बंद करतात.. असं जर तुम्ही करत असाल तर त्याचा तुम्हाला काही एक फायदा होणार नाही, हे निश्‍चित. ब्रेकफास्ट बंद करण्याऐवजी तुम्ही दुपार किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी थोडं कमी खाऊन कॅलरीजवर नियंत्रण ठेऊ शकाल.

पुढे पहा फळांचे सेवन किती आवश्यक आहे....


फळ खा

WD
दिवसातून दोन वेळा तरी फळं खा. फळांमुळे तुमच्या चरबीवर नियंत्रण राहील तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाणंही फळांमुळे नियमित राहतं आणि फळं खाल्ल्यामुळे तुम्ही तणावविरहीत राहाल.

शरीरासाठी संपूर्ण झोप किती महत्त्वाची आहे....


संपूर्ण झोप घ्या

WD

पुढे पहा खाली बसून जेवणाचे फायदे....

दिवसात आठ तासांची झोप प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते.. आणि झोप ही तुमच्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. यामुळे तुमच्या कॅलरीजवरही नियंत्रण राहतं.


खाली बसून जेवण घ्या

WD

जेवळ घेताना खाली बसा आणि मग शांतपणे जेवा.. जेवताना टीव्ही पाहणं, मोबाइलवर बोलणं, मॅसेज करणं अशा गोष्टी टाळा. त्यामुळे तुमचं संपूर्ण लक्ष जेवणाकडेच राहील आणि तुम्ही योग्य प्रमाणात आहार घ्याल.

व्यायाम किती करावा आणि कधी?


व्यायाम किती करावा आणि कधी?

WD


तुम्हाला किती प्रमाणात व्यायामाची आवश्यकता आहे, हे तज्ज्ञांकडून अगोदर जाणून घ्या. तुम्हाला सोयीस्कर न ठरणार्‍या वेळेत व्यायाम जबरदस्तीने करणे टाळा. कारण यामुळे तुम्ही लवकरच व्यायाम करण्याला बोअर व्हाल.. आणि व्यायाम करणंच सोडून द्याल. तसंच व्यस्ततेमुळे किंवा इतर कामांमुळे तुम्हाला वेळाही पाळता येणार नाहीत. तेव्हा तुम्हाला सोयीस्कर पडतील, अशा वेळा शोधून काढा. आणि स्वत:ला फारसा त्रास न देता वजनावर नियंत्रण ठेवा.