गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

व्यायाम केल्याविना कमी करा वजन

लठ्ठपणामुळे परेशान असाल आणि वेळ नसल्याने किंवा कंटाळा येत असल्याने व्यायाम करू शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही सांगत आहोत काही सोपे उपाय ज्याने आपल्याला व्यायाम करण्याची गरज ही भासणार नाही आणि हळू-हळू वजनही कमी होईल. अमलात आणा हे सोपे उपाय: 
 
* ऍक्टिव्ह राहा: कोणतेही काम सुस्तपणे न करता ऍक्टिव्ह राहा. याने रक्त प्रवाहाला गती मिळेल आणि शरीराचा आपोआप व्यायाम होईल. 


 
फॅटी फूड टाळा: पिझ्झा, पास्ता, चीज, बर्गर अश्या फॅटी पदार्थांपासून दूर राहा, कारण या पदार्थांने वजन वाढण्याची गती वाढते. यात अत्यधिक प्रमाणात फॅट्स असतात आणि यांचा मोह सोडला नाही तर वजन कमी होणे शक्य नाही.

* भुकेपेक्षा कमी खावे: एकाच वेळी खूप खाणे योग्य नाही. जेवढी भूक असेल त्याहून कमी भोजन करावे. याने चरबी चढत नाही. या व्यतिरिक्त डिनरमध्ये सलाड, फळं आणि लिक्विड पदार्थांचे सेवन करावे.


 
प्रोटीन आणि फायबर: आपल्या आहारात प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात घ्यावं. याने पोट भरल्यासारखे वाटेल आणि अतिरिक्त कॅलरीपासून बचाव होईल. या व्यतिरिक्त फायबरने मिळणारी ऊर्जा आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी बाध्य करेल ज्याने आपोआप वजन कमी होईल.
 

* जेवून लगेच झोपू नये: डिनर झाल्यावर लगेच झोपू नये. डिनर आणि झोपेच्या मध्ये सुमारे दोन ते तीन तासांचे अंतर असावे.


 
भरपूर झोप घ्यावी: झोपेच्या अनियमितपणामुळे किंवा कमी झोप घेतल्यामुळे वजन वाढतं. चांगल्या आरोग्यासाठी 6 ते 8 तास झोपावे. झोप पूर्ण न झाल्यास ताण वाढतो आणि ताण वाढल्याने पण वजन वाढतं.

* पाणी: दिवसभरात प्रत्येक तासाला ठराविक प्रमाणात पाणी प्यावे. जेवण्याच्या थोड्या वेळ आधी आणि थोड्या वेळ नंतर पाणी प्यावे. याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. जेवल्यानंतर गरम पाणी पिण्याने पानी अतिरिक्त चरबीपासून बचाव होईल. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याने चरबी कमी होते. या व्यतिरिक्त दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाणी पिण्याने वजन कमी होईल. 


 
आराम हराम: जर आपल्या ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्या राहण्याची सवय जडली असेल तर ती लगेच सोडा. तासोतास एकाच जागी बसून राहण्याने पोट आणि हिप्सची चरबी वाढते. अश्या परिस्थितीत थोड्या थोड्या वेळ्यात उठून फिरावे.