शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (17:12 IST)

संतुलित वजनासाठी

संतुलित वजन हे निरोगी आरोग्याचे पहिले लक्षण. अनेकजण वजन संतुलित ठेवण्यासाठी डाएटिंग, जिम, योगाला प्राधान्य देतात; पण यात खंड पडल्यास लगेचच वजन पुन्हा वाढते. त्यामुळे वजन संतुलित ठेवण्यासाठी संतुलित आहाराला प्राधान्य देणं आवश्यक आहे.

त्यासाठी सर्वप्रथम बाहेरचं खाणं खूप कमी केलं पाहिजे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. 
 
संत्र्यामध्ये कॅलरी आणि फायबर पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे वजन संतुलित ठेवून उत्साह राखला जातो. रोज एक सफरचंद खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं.

फरसबीमध्येही मुबलक प्रमाणात फायबर असल्यानं कोलेस्टेरॉलचं प्रमाणही प्रमाणात राहतं, आपोआपच वजनही नियंत्रणात राहतं.