शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 एप्रिल 2014 (16:49 IST)

स्थूल महिलांच्या बाळाला हृद्यरोगाची शक्यता

स्थूल मातेपासून जन्मास येणाऱ्या बाळाला जन्मत: हृदयरोगाची शक्यता जास्त असते. तसेच हृदयाची रचना गुंतांगुंतीची होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. सिडनी विश्र्वविद्यालयात करण्यात आलेल्या संशोधनात या गोष्टीचा खुलासा झाला. 

 
हृद्यरोगाचे प्रमुख कारण शरीरच्या मुख्य रक्तवाहिनी मधून डाव्या धमनी मोठ्या असणे हे नवजात बाळाच्या वजनावर अवलंबून नसते. ‘आकॉइव्य ऑफ चाइल्डहूड’ पत्रानुसार आणि नियोनेटल अंकाच्या प्रकाशित रिपोर्टनुसार या संशोधकाने सल्ला दिला. 

यावरून हे सिद्ध होते की, स्थूल महिलांच्या बाळाला हृद्याच्या रक्तवाहिनी निगडीत रोग होण्याची शक्यात दाट असते. आणि या प्रकारच्या घटनांची संख्याही उल्लेखनीय आहे. विकसित देशात निम्या पेक्षा जास्त महिला स्थूलपणाला बळी पडल्या आहेत.