गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

स्वाईन फ्लूला घाबरू नका

स्वाईन फ्लूने आता देशभर हात पाय पसरवण्यास सुरुवात केली असून, एकट्या पुण्यात याने अनेकांना पछाडले आहे. साधी सर्दी झाली तरी अनेक जण स्वाईन फ्लू झाला असे समजून आधी खचून जात आहेत. या रोगाची लक्षणं काय? हा रोग कशाने होतो? याचा हा थोडक्यात पण महत्त्वाचा आढावा.
स्वाईन फ्लूची लक्षणं काय?
हा रोग होण्यापूर्वी अंगात कणकण जाणवते. थोडा ताप येतो. सर्दी खोकला यामुळे जीव हैराण होतो. घशात खवखवणे, चक्कर येणे, कफ दाटणे यासारख्या समस्या यामुळे निर्माण होतात. त्रास अधिकच वाढला तर जुलाब आणि उलट्यांनाही सुरुवात होते.

ही काळघी घ्या
*वरील लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन दवाखान्यात रक्ताची तपासणी करून घ्यावी. खोकला आल्यानंतर चेहऱ्यावर मास्क लावाल अथवा, कोणी खोकत असेल तर त्याला तोंडासमोर रुमाल धरण्याची विनंती करावी.
*दर दोन तासांनी रुग्णाचे हात गरम अथवा कोमट पाण्याने धुवावेत.
*सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
*रुग्णाच्या खोलीत इतरांना प्रवेश टाळावा.
*रुग्णाच्या खोलीत स्वच्छता ठेवावी. त्याचा इतरांशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी.