गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

मुलं बिछान्यात सू करत असेल तर...

काही पालक यामुळे परेशान असतात की त्यांचे मुलं वयात आल्यावरही रात्री बिछान्यात सू करतात. ही समस्या जटिल नसली तरी याचे कारणं वेगवेगळे असू शकतात. काही तज्ज्ञांप्रमाणे स्नायू विकृती किंवा पोटातील जंतूंमुळे मुले सू करतात. काही लोकांचे म्हणणे आहे की मसालेदार जेवण किंवा थंड पदार्थांचे अती सेवन केल्यामुळे ही समस्या उत्पन्न होते.

पण ही समस्या दूर करायची असेल तर औषध देण्यापूर्वी काही सवयी बदलण्याची गरज आहे:
 
* रात्री झोपण्यापूर्वी मुलांना पाणी पाजू नये.
मुलांना झोपण्याच्या कमीत कमी एक तासाआधी जेवण द्यावे. आणि त्यानंतर काहीही पदार्थ खायला किंवा प्यायला देऊ नये.
झोपण्यापूर्वी सू करायला न्यावे.
झोपण्यापूर्वी हॉरर शो किंवा मानसिक त्रास देणारे टीव्ही शो, कार्टून पाहणे टाळावे.
झोपताना गोष्ट ऐकण्याची सवय असेल तर सामान्य किंवा मनोरंजक कहाण्या सांगाव्या.
सतत मुलांना भीती दाखवू नये.
 

काही घरगुती औषधं...
 
 

* रोज 1 ग्राम ओवा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी मुलाला खाऊ घालावे. काही दिवस हा नियम पाळल्याने आराम मिळेल.

* दोन मनुकाच्या बिया काढून त्यात एक-एक मिरं टाकून रात्री झोपण्यापूर्वी खायला द्यावी. दोन आठवडे हा नियम पाळावा.


* जांभळाच्या बिया वाळवून पिसून घ्या. हे चूर्ण दोन-दोन ग्राम दिवसातून दोनदा पाण्यासोबत सेवन केल्याने आराम मिळेल.
 
रोज दोन अक्रोड आणि वीस मनुका मुलांना खायला दिल्याने बिछान्यात सू करण्याची समस्या दूर होते.


* 250 मिली दुधात एक-दोन मनुका उकळून दोन तासासाठी तसंच राहू द्या. नंतर दुधातून मनुका काढून मुलाला खायला द्या. वरून कोमट दूध पाजा. काही दिवस हे नियमित केल्याने समस्या दूर होईल.

रात्री झोपताना मध चाटायला दिल्यानेसुद्धा ही समस्या दूर होते.