Widgets Magazine
Widgets Magazine

उन्हाळ्यात सेवन केल्याने होतात हे Big Benefits

उन्हाळ्यात जीव घाबरणे, चक्कर येणे, भूख न लागणे, हागवण इत्यादी गोष्टी फारच सामान्य असतात. अशात गर्मीत होणार्‍या या समस्यांसाठी काही घरगुती उपचार करून तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. गर्मीत जिरं फारच उपयोगी असतो. जीर्‍यामुळे फक्त जेवणाचा स्वादच वाढत नाही तर त्यामुळे बरेच आजार दूर होऊ शकतात. तर तुम्ही जीर्‍यात असणारे गुणांबद्दल जाणून घ्या....
 
1. उन्हाळ्यात जिरे फारच गुणकारी आहे. ऊन वाढल्यास दोन कप पाण्यात अर्धा चमचा धने, सोफ व अर्धा चमचा जिरे टाकून उकळून घ्यावे. गार झाल्यावर गाळून त्यात साखर घालून प्यायला पाहिजे, त्याने गर्मीत आराम मिळतो.  
 
2. उन्हामुळे जर जुलाभ लागले असतील तर जिरं आणि साखर दोन्ही सम प्रमाणात घेऊन त्याची बारीक पूड करून घ्यावी. एक ते दोन चमचे गार पाण्यासोबत ही पूड घ्यावी. गर्मीमुळे होणारे जुलाभ लगेचच थांबतात.   
 
3. दक्षिण भारतात लोक नेहमी जिर्‍याचे पाणी पितात. त्यांच्यामते याचे सेवन केल्याने मोसमी आजारांपासून बचाव होतो आणि पोटही उत्तम राहते.  
 
4. जीर्‍यामुळे बॉडीतील शुगर लेवल नियंत्रात राहते. जिर्‍याची पूड करून एका बाटलीत भरून ठेवावे. अर्धा लहान चमचा जिरे पूड दिवसातून दोनवेळा पाण्यासोबत घ्यायला पाहिजे. डायबिटीजच्या रुग्णांना यानी फार फायदा होतो.  
 
5. जिरं, ओवा, सुंठ, काळे मिरे आणि पादे मीठ अंदाजाने घेऊन त्याची पूड तयार करून घ्यावी. थोड्या तुपात हिंग व पूड मिसळून  याचे सेवन केल्याने पचन शक्तीत वाढ होते आणि पोटाच्या आजारात आराम पडतो.  
 
6. ज्या लोकांना रात्री झोप लागत नाही त्यांच्यासाठी जिरं हे उत्तम औषध आहे. एक लहान चमचा भाजलेले जिरे पिकलेल्या केळीत मॅश करून खाण्याने गाढ झोप लागते.  
 
7. गर्मीमुळे भूख न लागणे ही एक सामान्य समस्या असते. जर तुम्हाला भूक लागत नाही किंवा अजीर्ण होत असेल तर पाव चमचा जिरे आणि मिरे पूडला एका ग्लास दुधात घालून प्यायला पाहिजे.  
 
8. जिर्‍याला लिंबाच्या रसात मीठ मिसळून वाळवून घ्यावे. नंतर याची पूड करून बाटलीत भरून ठेवावी. याचे सेवन केल्याने गर्भवती महिलांना उलटीत आराम मिळतो व त्यांचा जीव घाबरत नाही.  
 
9. जिर्‍यात सिरका मिसळून खाल्ल्याने लगेचच हुचकी येणे बंद होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

उन्हाळ्यात करा मीठाच्या पाण्याने आंघोळ

जास्त थकवा आला असताना मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शारीरिक वेदना, थकवा कमी होतो. ...

news

सेक्स करताना स्त्रियांना हवं असतं हे

तसे तर स्त्रियांना काय हवं असतं हे माहित करणे कठिणच आहे तरी सेक्स दरम्यान त्यांना ...

news

जाणून घ्या सेक्सला का घाबरतात काही मुली

लवमेकिंग सुंदर क्षण असले तरी आपल्याला हे जाणून हैराणी होईल की या दरम्यान स्त्रियांच्या ...

news

या ड्रिंकने सात दिवसात कमी करा फॅट्स

साइड इफेक्टचा धोका टाळून आपण घरगुती औषधाने बॉडी फॅट्स दूर करू शकता. येथे आम्ही जी रेसिपी ...

Widgets Magazine