गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

कारले आहे.बहुगुणी

ND
कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.

ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. त्यात फॉस्फऱस भरपूर असते. कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. आहारात त्याचा अंतर्भाव केल्यास जेवण व्यवस्थित पचते. शिवाय भूकही चांगली लागते.

दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर आहे. पोटात गॅस वा अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रूग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते.

उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे. लगेचच फरक पडतो. यकृताच्या रोगांसाठी कारले रामबाण औषध आहे. जलोदर झाल्यास किंवा यकृत वाढल्यास अर्ध्या कप पाण्यात दोन मोठे चमचे कारल्याचा रस मिसळावा व रोज बरे होईपर्यंत तीन चार वेळा सेवन करावे.

कारले रक्तशुद्धीही करते. मधुमेहाच्या रूग्णांना एक चतुर्थांश कप कारल्याच्या रसात तेवढाच गाजराचा रस मिळवून प्यायला द्यावे. गाठ आल्यास किंवा हातापायांची आग होत असल्यास कारल्याच्या तेलाने मॉलिश करावे. असे हे कारले बहुगुणी आहे.