बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

पौष्टिक पेय ताक!

WD
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिज व बी-12, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन मुबलक प्रमाणात असतात. ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक मनवले जाते. ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात. ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणा रे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.

ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेपटोकोकस, जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असतो. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करावा. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.