शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

लवंगा दमा आजारावर गुणकारी

लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मि. ली. पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसांतून 3 वेळा घ्यावा त्याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो. 

दाताच्या दुखण्यातसुद्धा लवंग गुणकारी असते, यात असलेले एंटिसेप्टिक गुण दातांमध्ये संक्रमणाला कमी करतात. 

दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकं दुखी थांबते. 

डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.