गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

लहान-सहान समस्यांना सोडवण्यासाठी घरगुती उपाय

* काच किंवा खडा खाण्यात आल्यास गरम दुधाबरोबर तीनदा इसबगोल घ्या.
* जखम पकू नये यासाठी त्यावर सहन होईल तितकी गरम साय बांधावी.
* बोबडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी दोन ग्रॅम शेकलेली तुरटी तोंडात ठेवावी.
* मुलांच्या पोटात दुखत असल्यास आले रस आणि पाच ग्रॅम तुळस घोटून तीनदा पाजावे.
* हिवाळ्यात मुलांना तुळशीची चार पाने 50 ग्रॅम पाण्यात मिसळून पहाटे पाजावे.
* पोटदुखीकरिता तुळस आटवून पहाटे-पहाटे घेणे फायदेशीर.
* छातीत जळजळ होत असल्यास ग्लासभर गार पाण्यात लिंबू पिळून प्यावे.
* दारू जास्त झाली असल्यास तुरटी पाण्यात किंवा दुधात मिसळून पाजावे किंवा दोन सफरचंदाचे रस पाजावे.
* तुरीच्या पानांचा रस पाजण्याने अफीमचा उन्माद कमी होतो.
* पाण्यात तुरीची डाळ उकळून त्याचे पाणी पाजल्याने भांगेचा उन्माद कमी होतो.
* केळी पचवण्यासाठी दो लहान वेलच्या पुरेश्या आहे.
* जास्त आंबे खाण्यात आले असतील तर ते पचवण्यासाठी थोडे मिठाचे सेवन करायला हवे.
* तोंडाची दुर्गंध दूर करण्यासाठी डाळिंबाचे जाड सालपट पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.
* मासे खाताना काटा गळ्यात अडकल्यास केळी खायला पाहिजे.
* उचकी येत असेल तर पुदिन्याची पाने किंवा लिंबाचे रस चोखावे.
* वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायला पाहिजे.
* जखमेवरील किड नाहीशी करण्यासाठी त्यावर हिंग पावडर टाकायला हवी.
* दाढ दुखत असेल तर हिंग लावून कापसाचा गोळा वेदना होत असलेल्या जागेवर ठेवावा.