गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

स्वस्थ झोपेसाठी..

अनेकांना निद्रानाशाची समस्या भिडसावते. काही औषधांची सवय लागू शकते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहावेत. 
 
झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध घेतल्यानं शांत झोप लागते. दुधामधील अमिनो अँसिडमुळे झोप शांत लागण्यास मदत होते. 
 
दिवसभरात दह्याचं सेवन होत असेल तर शांत झोप लागते. 
 
झोपण्याआधी दूध किंवा पाण्यासवे चिमूटभर जायफळाची पावडर घेतल्यास चांगला परिणाम दिसतो. 
 
झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस, साखर आणि मध एकत्र करून हे चाटण घेतल्यास झोप चांगली लागते. 
 
रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेत व्यत्यय येत नाही. 
 
झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पानं घालून आंघोळ केल्यास अतिशय सुखकर झोप लागते. 
 
रात्रीच्या जेवणात फळांचा रस, ताज्या भाज्या आणि सार असावं. झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नये तसंच अन्य उत्तेजक द्रव पदार्थ टाळावेत. विशेषत: साखरेचा वापर असलेले पेय टाळावं. कारण साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि झोपेवर परिणाम होतो. साखरेऐवजी मधाचा वापर करावा. 
 
झोपण्याआधी प्राणायाम केल्यास शांत आणि स्वस्थ झोप लागण्यास मदत होते. एखादं पुस्तक वाचत अंथरुणावर पडल्यासही लवकर झोप लागते.