शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (12:45 IST)

|| एक कडू सत्य ||

नदीत किंवा तलावात आंघोळ
करायला लाज वाटते,
आणि
स्विमींग पूलमध्ये पोहण्याला
फॅशन वाटते.
गरीबाला एक रुपया दान
नाही करु शकत,
आणि
वेटरला मात्र १०रु.टिप देण्यात
मोठेपणा वाटतो.
पंक्तीत बसून जेवणे ही जुनी
पध्दत वाटते,
आणि
पार्टीत  खाण्यासाठी रांग
लावण्यात छान वाटते.
बहीण काही मागत असेल तर
फालतू खर्च वाटतो,
आणि
गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य
समजले जाते.
गरीबाकडून भाजी घेण्यात
कमीपणा वाटतो,
आणि
शॉपिंग मॉलमध्ये,आपला
खिसा रिकामा करण्यात
अभिमान वाटतो.
जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो
जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो
जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि
जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.
मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
        आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
              जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही
 जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....
आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात...
             I love you aai