Widgets Magazine
Widgets Magazine

सौ. सुधा मुर्ति म्हणतात .........

बऱ्याच स्त्रियांना शारिरीक 
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात, वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...
 
पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल, 
याचा विचार करून स्वतःला 
घडवू नका...
 
पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य
तोलणं, म्हणजे स्वतः मधील 
स्त्रीत्वाचं अधःपतन करवून
घेणं आहे...
 
सकाळी उठून सडा-संमार्जन 
झाल्यावर स्वतःच्या हातानं 
काढलेली रेशीमरेषांची रेखीव 
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला 
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...
 
स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ  
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या 
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!
 
तुम्ही शिक्षिका असाल, तर 
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे 
लिहिलेल्या अक्षरात असेल. 
विषयाचं आकलन झाल्यावर 
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, 
ही तुमचीच सुंदरता आहे...
 
सौंदर्य कपड्यात नाही, 
कामात आहे....
 
सौंदर्य नटण्यात नाही, 
विचारांमधे आहे... 
 
सौंदर्य भपक्यात नाही, 
साधेपणांत आहे... 
 
सौंदर्य बाहेर कशात नाही, 
तर मनांत आहे...!!
 
आपण करत असलेलं 
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!
 
आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...
 
प्रेमानं बोलणं 
म्हणजे सुंदरता...!!
 
आपलं मत योग्य रीतीनं 
व्यक्त करता येणं 
म्हणजे सुंदरता...!!
 
नको असलेल्या गोष्टीला 
ठाम नकार देण्याची हिंमत 
म्हणजे सुंदरता...!!
 
दुसर्‍याला समजावून घेणं 
म्हणजे सुंदरता...!! 
 
आपल्या वर्तनातून, विचारातून 
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.
 
हाती आलेला प्रत्येक क्षण 
रसरशीतपणे जगण्यांत 
खरी सुंदरता आहे...!!
 
आपण करीत असलेल्या 
कामात कौशल्य प्राप्त झालं, 
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची 
जाणीव येते...
 
अशी आत्मविश्वासानं
जगणारी स्त्री आपोआप
सुंदर होते, हा माझा  
स्वानुभव आहे...
 
इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...
 
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या 
ठोशात आहे...
 
बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...
 
लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या 
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...
 
वेळ प्रसंगी या सर्वजणींची 
आठवणच आपलं जगणं 
सुंदर करायला मदत करेल...
 
आपण जशा जन्माला आलो 
आहोत, तशा सुंदरच आहोत, 
ही खूणगाठ मनाशी बांधून 
टाकली, की सौंदर्याकरीता 
दुसर्‍या कुणाच्या पावतीची 
गरज पडत नाही आणि  
अवघं विश्व सुंदर भासतं...!!! Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी जोक्स : 5 STAR

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त ५ STAR हॉटेलात जेवून ...

news

मराठी जोक्स : SURPRISE देऊ

छोटा राजू at his INNOCENT level राजूचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले ...

news

मराठी जोक्स : आती क्या खंडाला?

एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते. तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि ...

news

आधी परकर बदला...

नवरा: का गं! ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी अख्खं शहर बदलून टाकीन... मला जर ...

Widgets Magazine