testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या श्लोकाचा अर्थ काय हो !

Last Modified मंगळवार, 21 मार्च 2017 (15:13 IST)
बंड्याने संस्कृत च्या गुरुजींना विचारले
गुरुजी


येन रूक नपाम्रधु।
येन रूक नपाद्यम॥

या श्लोकाचा अर्थ काय हो
!

गुरुजींनी अनेक ग्रंथां मध्ये हा श्लोक शोधला.भरपूर मेहनत घेतली जंग जंग पछाडले

पण कुठेच काही शोध लागला
नाही.

२-४ दिवसांनी गुरुजींनी बंड्यालाच विचारले,


" बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ? "

बंड्या
गुरुजींना म्हणाला

- " हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी...


गुरुजीं बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले..

तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवले,


गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला..


बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. तिथं लिहीलं होतं


धूम्रपान करू नये।

मद्यपान करू नये॥


यावर अधिक वाचा :