Widgets Magazine
Widgets Magazine

Whats app Message : प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता

प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता
 
खूप झालं, बास झालं
थकले आता म्हणायला शीक
केलं तेव्हढं पुरे झालं
आता थोडं थांबायला शीक
 
नाती गोती कुटुंब कबिला
बाजूला जरा ठेवायला शीक
इतरांसाठी आयुष्य वेचलं
स्वतःसाठी जगायला शीक
 
विसरून रोजची कामं खुशाल
उशिरापर्यंत लोळायला शीक
संसाराचं ओझं आपलं 
थोडं share करायला शीक
 
कसं होईल, काय होईल
चिंता सर्व टाकायला शीक
माझ्याविना घर हे चालेल
असा विश्वास ठेवायला शीक
 
जॉब, घर, मुलं आणि बिलं
यांची कसरत विसरायला शीक
Superwoman व्हायचं सोडून
दमानं जरा जगायला शीक
 
घड्याळाची endless टिकटिक
दुर्लक्षित तू करायला शीक
उठल्यापासून झोपेपर्यंतच्या
कामाचे हिशोब विसरायला शीक
 
आपल्या उरावर घेतलेली कामं
आतातरी टाकायला शीक
गेलं उडत काम म्हणून
निवांत पुस्तक वाचायला शीक
 
पाय पसरून, पेपर धरून
चहाचे घोट घ्यायला शीक
Calorie count विसरून जरा
आयतं food मागवायला शीक
 
याचं जेवण त्याचा डबा
कपडे याचे नि औषध काढा
घर पसारा भाजी पाला
सगळं सगळं सोडायला शीक
 
कोणासाठी न थांबता
Steering हाती धरायला शीक
नियम सारे मोडून कधी
सुसाट गाडी पळवायला शीक
 
सगळ्यांसाठी सगळं केलं
कामचुकारपणा करायला शीक
अर्ध अधिक आयुष्य सरलं
आतातरी बाई जगायला शीक
आतातरी बाई जगायला शीक
Dedicated to all wonderful woman that you are! Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

गप्प बस...

हिंदु लोकांना एवढा तरी अधिकार द्या ... कि जेव्हा हिंदू पुरुष आपल्या बायकोला 3 वेळा ...

news

चंद्र देशील का आणुन...?

प्रेयसी: तु माझ्यासाठी काय करशील..?? प्रियकर: तुला काय हवं.....

news

....खरच आपण सुधारलोय का ?

पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं ...

news

पक्ष्यांसाठी सरबत

गण्याची आई: पक्ष्यांसाठी गच्चीवर पाणी ठेवल्याने सुंदर आणि सुशील बायको मिळते. गण्याने ...

Widgets Magazine