Widgets Magazine
Widgets Magazine

Whats App Message : बाकी सगळं जाऊ दे,गंगेला मिळू दे!

ती घर आवरत होती...
तो सारखं पहात होता...
नजरेत त्याच्या कौतुकाचा 
दिवा जळत होता!
 
तिलाही नवल वाटलं 
त्याची अशी नजर पाहुन 
लाजली ती हलकेच 
अन् गेली भारावून !
 
"असं काय बघताय ?
हवंय का काही ?"
"...बघू दे ना असंच 
नकोय दूसरं काही!"
 
"तुमचं उगाच काही तरी"
म्हटलं..पण सुखावली मनात...
त्यानं दुखावली कित्येकदा 
पण विसरली सारं क्षणात!
 
"आज स्वारी अशी फार्मात 
असं काय झालं ?
काय घेऊन बसलात 
माझं कौतुक मेलं !"
 
"राबराब राबलो 
अन् फाइल पूर्ण केलं 
एका चुकीचं निमित्तअन् 
बॉसनं नको तेवढं झापलं!
 
पुरुष असलो तरी 
डोळे आज पाणावले 
"हीचं ही असंच होत असेन!"
ह्रुदय आतून हेलावले!
 
सारंच आवरुन कशी तू 
हसून स्वागत करतेस?
कौतुकाची थाप नाहीच 
पण राग मात्र झेलतेस!
 
आज मला शब्द दे; 
असं सोसणं तू बंद कर 
चुकलो मी कुठं तर 
दाखवून देणं सुरू कर!
 
तुझ्या गप्पं राहण्यानं 
सारे गृहीत तुला धरतात 
बाहेरचा राग वैताग 
फक्त तुझ्यावर काढतात!"
 
पापण्यांच्या कडा पुसत 
ती हळुच बोलली 
"बाकी सगळं जाऊ दे,गंगेला मिळू दे 
अशीच कौतुक थाप 
फक्त अधून मधून मिळू दे!"Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी विनोद : माहेरच्यांबद्दल का बोलता.?

बायको= तुम्ही सारख सारख माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता.? जे काय बोलायचं ते मला बोला.

news

मराठी विनोद : Sorry Sorry

बायको: तुम्ही मला सारखं सारखं sorry sorry नका म्हणत जाऊ. नवरा: का?

news

शनिवार आणि गटारी यांचा दुर्मिळ योग...

शनिवार आणि गटारी हा दोनशे वर्षांनी एकदाच येणारा अत्यंत दुर्मिळ योग आला आहे. ...

news

Gatari kadak गटारी स्पेशल: फुल टल्ली

गटारी साजरी करण्याची वेळ आली आहे आणि काही लोकं इतर सणांपेक्षा या दिवसाची आतुरतेने वाट बघत ...

Widgets Magazine