Widgets Magazine

आयुष्य झालंय Busy तरी....

आयुष्य झालंय
Busy तरी ,नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....

कोणी दाखवत उघड उघड ,काहींचा Silent mode आहे....
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....

न भेटताही
गप्पांचे अड्डे , Whatsapp कट्ट्यावर जमतात...

दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype'
मुळे chat होतो...

विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....

हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,

गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....

Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...

काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...

कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे
'Decode' होतं....

Internet च्या जाळ्यामुळेच , आपण दूर असूनही 'Close'
आहोत...
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....


यावर अधिक वाचा :