testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस....

Last Modified शुक्रवार, 13 जुलै 2018 (02:48 IST)
हाती चहा पेला, अन् बाहेर पाऊस ओला
भजी गरम कांद्याची, तुम्ही येता का बोला

करू पावसाळी गप्पा, गाऊ पाऊसगाणी
बालपण, पावसाची आठवू कहाणी

अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस
आपण फक्त मोठे झालो, विसरलो हौस

पुन्हा पावसात सोडू आपण कागदहोडी
एकमेकां भिजवून करू बालखोडी

चिखलात रोवू पाय, माती गोड स्पर्श
मोठेपणी टिपून घेऊ, तोच बालहर्ष

निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव
पावसाच्या थेंबाची चाखू गोड चव

अंगावर लेवू पाऊस, विसरून भान
आजही तो आपल्याला करेल लहान

बंद दार मनातले हळूचकन् खोला
वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला...


यावर अधिक वाचा :

काळजात घर करणारा सुबोध भावे

national news
कट्यार प्रमाणेच काळजात घुसून आपले स्थान निर्माण करणारा सुबोध भावे हल्ली तुला पाहते रे ये ...

असा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम

national news
बॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...

हसू थोडं, व समजू थोडं

national news
प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...