testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

Last Modified गुरूवार, 24 जानेवारी 2019 (12:15 IST)
एक पाण्यानं भरलेली अद्श्य घागर असते .....
तिचा तोल सांभाळतच तिला आयुष्य काढायचे असते....
आणि प्रत्येकीच्या घागरीत असते,
विचारांची,जाणीवांची,जबाबदारीची संवेदना आणि सासर-माहेरचा समतोल ठेवूनच तिला चालायचं असतं...

आणि ते ही...
मान ताठ ठेऊनच चालायचंय तिने....
आणि चेहर्‍यावर ठेवायचंय खरं किंवा उसनं हसू....

घागरीतील पाणी कधी कधी खूप
हिंदकळते...
कधी शिंतोडे उडवते...
खळखळून तिथल्या तिथेच गिरक्या मारते..
कधी घागरीच्या कडेवर जोरजोरात ठेचकाळते....
पण तरीही ते घागरीतच
राहते.....
पाणी हिंदकळताही
उपयोगी नाही
घागर सुटूनही
चालणार नाही.....

पायी काटे, डोईवर रणरणतं उन...
तरीही
ती वाहतेच आहे पाणी युगानूयुगे.....

आपल्या वाटणीचा हा पाणवठा भरतेच आहे.....
तन मन थकले तरी ...कर्तव्य तिचे चालू आहे....

तरीही ....
पाणी आणि घागरीचा तोल ती आदी काळापासून सांभाळत आहे....

असंही एक ऋतूचक्र आणि अशीचही एक तू...
वंदन तुम्हा प्रत्येकीला....


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...

आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला ...

national news
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी ...

पाकिस्तानी गायकांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली

national news
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान ...

पुलवामा शहिदांच्या सन्मानार्थ अजय देवगणचा मोठा निर्णय, ...

national news
14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात ...

अमिताभ बच्चन लवकरच आणत आहे 'कौन बनेगा करोड़पति' सीझन 11

national news
टीव्हीचे सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोड़पति लवकरच आपल्या 11व्या सीझन बरोबर परत येणार ...