शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

#whatsapp cornerपुणेरी उखाणे...


श्रावणात बरसती रिमझिम धारा
मी पिते कॉफी हे घालतात वारा
 
 

एका हातात पिशवी, एका हातात रुमाल
नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल?
 
 
बशीत बशी... बशीत बशी
माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी....
 
 
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय
अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
 
खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका
मी तुझी मांजर तु माझा बोका
 
 
विड्याच्या पानावर पाव शेर काथ
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ..
 
अगाध असते देवाची करणी
निर्मितो नारळात पाणी
शेजारी चवळीची शेंग, 
मला मात्र "लोणच्याची बरणी" !
 
गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं
गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल...