शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

किचनची शिकवणी

ठरवलच जर मनापासून, 
तर कुठे ही शिकता येत. 
किचन मधील प्रत्येक भांड,
काहीतरी शिकवून जात.  
 
परात ,मोठी पातेली,
सारच सामावून घेतात.
मन मोठ करा असच,
जणू ते सांगत असतात.  
 
नात कस जपायच हेच,
कप बशी सहज शिकवते.
कपाकडून काही चुकले,
तर बशी मात्र संभाळून घेते.  
 
गाळणी, चाळणी व झारी,
निवडकपणा शिकवतात.
हव तेच तिघी निवडतात,
नको ते बाजूला करतात.  
 
वेळेच नियोजन कस कराव,
हेच तर कूकर शिकवत असतो. 
एकाच वेळी डाळ,भात शिजवतो, 
आणि बटाटा ही उकडून देतो.  
 
मिळूनमिसळून रहा असे,
मिक्सर नेहमीच सांगतो.
मिळेल त्या सगळ्यांना तो, 
मस्त एकजीव करून टाकतो. 
 
विळी ,सुरी आणि किसणी,
विषय सहज करायला शिकवतात. 
मोठ्या भाज्या बारीक चिरताना, 
सतत याचीच आठवण देतात.   
 
चमचा, ढवणा चिमटा,
सावधगिरी शिकवत असतात.
स्वतः उष्णता सोसताना ते,
आपला हात मात्र वाचवतात. 
 
भांडी ठेवण्याची मांडण, 
सुव्यवस्थापन दाखवून देते.
तीच्या असल्यामुळेच पटकन,
हवी ती वस्तू हाती मिळते.  
 
परत किचनमध्ये जाताना,
आता आदरानेच तुम्ही जा.
अजून काय शिकता येईल?
तेही नक्कीच शोधून पहा.