बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (14:32 IST)

आहे आज "बैल पोळा"!

सकाळी उठल्याबरोबर
त्याला मोठा धक्का बसला,
वाफाळलेला चहाचा कप
बायकोने हातात ठेवला !
 
अंघोळी आधी तेल लावून
मॉलिश सकाळी सकाळी,
जेवायला बसला तर 
पानात पुरणाची पोळी !
 
खुशीत जेवता जेवता
त्याच्या मनात आले,
सकाळपासून आज सगळे
विपरीत कसे घडले !
 
आज काय विषेश 
विचारले धैर्य करुन गोळा,
हसून म्हणाली विसरलात का
आहे आज "बैल पोळा"!