शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पत्ता सांगता का जरा?

कोल्हापुरातला प्रसंग- 
 
एक माणुस:- भाऊ पत्ता सांगता का जरा?
कोल्हापुरकर:- जरुर जरुर बघु...
पत्ता बघतो.....
आणि म्हणतो:- अरे हनम्या जरा दुकानावर लक्ष ठेव...ह्या पाहुण्यांसनी जरा त्यांच्या घरला सोडुन येतो.......
 
हाच प्रसंग 
पुण्यात....तो ही सदाशिव पेठेतला...
एक माणुस:- जरा पत्ता सांगता का भाऊ?
पुणेकर:- एवढंच काम आहे का मला.....बरं बघु.....कुठुन आलात?
माणुस:-मराठवाडा
पुणेकर:-शिक्षण काय झालयं तुमचं?
माणुस:-ग्रँज्युएट.  BA
पुणेकर:- पुण्यात यायचं नियोजन?
माणुस:-उच्च शिक्षणासाठी
पुणेकर:- नक्की नक्की..मिळेल तुम्हाला ईथे उच्च शिक्षण....ईथे कुणाकडे आलाय...?
माणुस:- भावाकडे
पुणेकर:- ते किती वर्ष राहतात पुण्यात?
माणुस:- बरीच वर्ष
पुणेकर:- तरी?
माणुस:- गेली २० वर्ष
पुणेकर:- काय करतात?
माणुस:- मार्केटींग
पुणेकर:-कशाचं?
माणुस:-होम प्रोडक्टस
पुणेकर:- कुठे कुठे करतात मार्केटिंग?
माणुस:- पुर्ण पुण्यात
पुणेकर:- त्यांच्याकडे फोन व गाडी आहे का?
माणुस:- हो आहे ना?
पुणेकर:- त्यांना फोन लावता का?
माणुस:- हो जरुर....माणुस फोन लावुन देतो....
पुणेकर फोन वर बोलतो...तुमचा भाऊ माझ्या दुकानापाशी थांबलाय...तो तुम्हाला माझ्या दुकानाचा पत्ता सांगेल..
त्याला न्यायला या....
पत्ता विचारणारा कोमात....