शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 16 फेब्रुवारी 2015 (14:57 IST)

प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते

एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे ... , 
 
हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर प-या त्यांच्याकडे पाठविल्या ,
 
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर प-यांना बघून ती 
आश्चर्यचकित झाली, तेव्हा ....
 
पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
 
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
 
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
 
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........
 
बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नव-याला म्हणाली ,
 
" आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे ".
 
नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.
 
त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व
 
म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको "
 
तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे
 
आश्चार्याची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील
 
आतआल्या.त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ,
 
" जर तुम्ही पैसा-परीनिवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या, पण
 
देवाच्या नियमाप्रमाणे जिथेजिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हटले
 
तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत " ♥ ♥ ♥
 
तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी ,
 
" प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००%
 
खरे आहे ".
 
" म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे "
 
दिवसाची सुरवात एका शुभ संदेशाने ....
 
शुभ सकळ मित्रांनो ... !!!