शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

अमावस्याचे तर्पण सर्व पितरांना तृप्त करतात!

WD
ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, अशांचे श्राद्ध पितृपक्षात येणार्‍या आमावस्येला केले जाते. पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी सकाळी तयार केल्या जाणार्‍या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून केले जातात. विधीवत पूजा करून गाय, कुत्रा व कावळा यांचा नैवेद्य केळीच्या पानावर दिला जातो.

या दिवशी पितरांसाठीच्या पंचपक्वान्नांनी सजवलेल्या ताटाचा सुंगध घेऊन गायीला नैवेद्य दिला जातो. अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आपापल्या वाटेला निघून जातात. त्याप्रमाणे पितर म्हणून आलेल्या व्यक्तीला जेवण, कपडे, रूमाल-टोपी व चपला देऊन अमावस्येच्या सायंकाळीच निरोप दिला पाहिजे. त्या दिवशी सायंकाळी ताजा स्वयंपाक करुन घराच्या दरवाज्याच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती प्रज्वलित करून ‍पूर्वजांचे नाव घेतले पाहिजे. मुलांबाळांना सुखशांती लाभू दे, अशी प्रार्थना करायला हवी.