testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जुलै 2014 महिन्यातील राशीफल

Last Updated: शुक्रवार, 4 जुलै 2014 (15:53 IST)
मेष : राशी स्वामी मंगळ आपल्या राशीच्या षष्ठ स्थानातून १४ तारखेपर्यंत भ्रमण करणार आहे. त्यामुळे नोकरदारांना नोकरीत बदल शक्य,
मात्र जबाबदारी वाढेल. नोकरीत बदल जरूर असावा पण त्यात स्थैर्य असावे, नाही तर शेवटी पश्‍चातापाची पाळी येईल. कामाच्या ठिकाणी धावपळीचे वातावरण राहील. नोकरीत कर्तव्य करावे, इतरांना सुधारणा करण्यासंबंधी उपदेश देत बसू नये. काही प्रमाणात प्रकृतीच्या तक्रारींचा त्रास सहन करावा लागेल. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल घडविण्याची गरज आहे. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करा. गरज वाटल्यास डॉक्टर बदलण्यास मागे-पुढे पाहू नये. विरोधकांवर विजय मिळवाल. गुरू महाराज आपल्या राशीच्या सुख स्थानातून भ्रमण करणार आहेत. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करा.

भावना आणि वैयक्तिक संबंधात संतुलन बनवून ठेवा. कौटुंबिक कलाहास कारणीभूत होणारे विषय टाळा. घरातील लोकांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. विद्यार्थी वर्गाला जास्त मेहनत घेण्याची गरज भासणार आहे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रात सरावाचे धोरण अवलंबवावे लागेल. बुद्धिमत्तेस खतपाणी मिळेल असे खेळ जोपासा. आपल्या गुरुजनांच्या आदेशाचे पालन करा. वेळेचे बंधन पाळा. आपल्या आकलनशक्तीचा विकास करा. स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. साहसी प्रयोग कटाक्षाने टाळा. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न करा. इतरांना सल्ले देणे टाळावे. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही ना याची काळजी घ्या. जोडीदारास दुखवू नका. गैरसमजुतींना थारा देऊ नका. जोडीदारास दाखविलेल्या स्वप्नांची पूर्तता करा. जोडिदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. संशयावरून कोणतेही गैरसमज होण्याची शक्यता आहे. ते टाळण्याचा प्रयत्न करा. सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात असे म्हणत हात-पाय गाळून बसू नये. प्रयत्न करणे सरतेशेवटी आपल्याच हाती असते.

शुभ देवता : गणपती उपासनेला प्राधान्य द्या, मनातील इच्छा पूर्ण होईल.

शुभ रंग : लाल


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

national news
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...