शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By वेबदुनिया|

तुमचा मूलक आणि नवीन वर्ष 2014

* मूलांकानुसार जाणून घ्या कसा असेल नवीन वर्ष

* अंकशास्त्रानुसार जाणून घ्या 2014 कसा ठरेल तुमच्यासाठी

WD


मूलक 1- 1 मूलकांच्या जातकांचा स्वामी सूर्य आहे तसेच वर्षाचे अंक 5 आहे. यांच्यात आपसात मित्रता असल्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखद असेल. अपूर्‍या कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असेल. कौटुंबिक बाबतीत महत्त्वपूर्ण कार्य घडतील. अविवाहितांचे विवाहाचे योग बनत आहे. नोकरधार्‍यासांठी हा काळ उत्तम आहे. बढतीचे योग आहे. बेरोजगारांसाठी देखील खुशखबर अशी आहे की या वर्षात त्यांची मनोकामना पूर्ण होईल.

पुढे पहा मूलक 2 .....


WD


मूलक 2- मूलक 2चा स्वामी चंद्र आहे व वर्षाचा स्वामी बुध आहे आणि या दोघांमध्ये शत्रुता आहे. हे वर्ष समजूतदारीने चालणे फारच महत्त्वाचे आहे. लेखन संबंधित प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागेल. डोळे झाकून कुठल्याही कागदावर सह्या करू नका. एखाद्या नवीन कार्याच्या योजनेची सुरुवात करण्याअगोदर मोठ्याचा सल्ला नक्की घ्या. व्यापार-व्यवसायातील स्थिती ठीक-ठीक असेल. आरोग्याच्या दृष्टीने सांभाळून चाला. पारिवारिक विवाद आपसात सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणाची मध्यस्थी ठीक नसेल.

पुढे पहा मूलक 3....


WD


मूलक 3 - मूलक 3चा स्वामी गुरु आहे व वर्षाचा स्वामी बुध आहे. गुरु-बुध आपसात सम आहे. हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखदायक ठरणार आहे. एखाद्या विशेष परीक्षेत यश मिळू शकते. नोकरधार्‍यांना उत्तम यश मिळेल. नवीन उद्योग धंद्याची योजना बनू शकते. दांपत्य जीवनात सुखद स्थिती असेल. घरात किंवा कुटुंबात शुभ कार्य घडतील. मित्रांचा साथ सुखद राहील. शत्रू वर्ग प्रभावहीन होतील. महत्त्वपूर्ण कार्यातून प्रवासाचे योग घडतील.

पुढे पहा मूलक 4....


WD


मूलक 4- मूलक 4चा स्वामी राहू आहे तसेच वर्षाचा मूलक 5आहे. दोघांमध्ये मैत्री आहे. हे वर्ष मागील वर्षाचे दुष्प्रभावांना दूर करण्यात सक्षम राहील. तुम्हाला सचेत राहून कार्य करावे लागतील. कौटुंबिक बाबतीत सहयोग मिळाल्याने यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल, तसेच मित्र वर्गाचा सहयोग मिळेल. नवीन व्यवसायाची योजना प्रभावी होण्यापर्यंत गुप्तता राखणे आवश्यक आहे. शत्रू पक्षावर प्रभावपूर्ण यश मिळेल. नोकरधारकांनी प्रयत्न केल्यास त्यांना यश नक्की मिळेल. विवाहाच्या बाबतीत आश्चर्यजनक परिणाम पुढे येऊ शकतात.

पुढे पहा मूलक 5....


WD


मूलक 5 - मूलक 5चा स्वामी बुध आहे तसेच वर्षाचा मूलक देखील 5 आहे. हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यकारी ठरेल. आतापर्यंत येत असलेल्या अडचणीदेखील या वर्षी दूर होतील. पारिवारिक प्रसन्नता राहील. संतानं पक्षाकडून आनंदाची बातमी कळेल. नोकरीवर्ग व्यक्तींसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. दांपत्य जीवनात मधुर वातावरण राहील. अविवाहित विवाहाच्या बंधनात अडकतील. व्यापार-व्यवसायात प्रगती झाल्यामुळे प्रसन्नता राहील.

पुढे पहा मूलक 6...


WD


मूलक 6 - मूलक 6चा स्वामी शुक्र व वर्षाचा मूलक 5चा स्वामी बुध आहे. बुध-शुक्राची स्थिती लेखन संबंधी प्रकरणात
उत्तम असेल. जे विद्यार्थी 'सीए'ची परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ राहील. व्यापार-व्यवसायात यश मिळेल.
विवाहाचे प्रबळ योग आहे. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळाल्याने प्रसन्नता राहील. नोकरीधारक व्यक्ती आपल्या श्रमाच्या बळावर उन्नतीचे हक्कदार असतील. बँकेच्या परीक्षांमध्ये देखील यश मिळेल. दांपत्य जीवनात संमिश्र स्थिती राहील. आर्थिक बाबतीत सांभाळून चालने गरजेचे आहे.

पुढे पहा मूलक 7....


WD


मूलक 7- मूलक 7चा स्वामी केतू आहे व वर्षाच्या मूलकाचा स्वामी बुध आहे. केतू ज्या ग्रहासोबत राहतो त्याप्रमाणे त्याचे फळ देतो. म्हणून तुमच्या कार्यात सुधारणा होईल. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. व्यापार-व्यवसायातील स्थिती उत्तम राहील. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल. नोकरीधारक व्यक्तींसाठी वेळ सुखकर राहील. नवीन कार्य-योजनेची सुरुवात करण्याअगोदर केशराचा तिलक लावावा.

पुढे पहा मूलक 8....


WD


मूलक 8 - मूलक 8चा स्वामी शनी आहे व वर्षाच्या मूलकाचा स्वामी बुध आहे. यांच्यात मित्रता झाल्यामुळे सर्व कामात
यश मिळेल. जे आतापर्यंत बाधित होत आहे ते ही सफल होतील. व्यापार-व्यवसायातील स्थिती उत्तम राहील. नोकरीपेशा
व्यक्ती प्रगती करतील. बेरोजगारांनी जर प्रयत्न केला, तर नक्की रोजगार मिळेल. शत्रू वर्ग प्रभावहीन होतील, आरोग्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. राजकारणातील व्यक्ती देखील वेळेचा सदुपयोग करून लाभान्वित होतील.

पुढे पहा मूलक 9 ....


WD


मूलक 9- मूलक 9चा स्वामी मंगळ आहे व वर्षाच्या मूलकाचा स्वामी बुध आहे. हे सम आहे म्हणून तुम्ही तुमच्या शक्तीचा सदुपयोग करून प्रगतीकडे वाटचाल कराल. पारिवारिक विवाद दूर होतील. महत्त्वपूर्ण कार्य योजनांमध्ये यश मिळेल. अधिकार क्षेत्रात वृद्धी संभव आहे. नोकरीत येणारी बाधा दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. राजकारणातील व्यक्तींना यश मिळू शकतो. मित्र स्वजनांचा सहयोग मिळाल्यामुळे प्रसन्नता राहील.