शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (07.05.2016)

मेष  : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. 

वृषभ : काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

मिथुन : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.

कर्क : शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

सिंह : योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

कन्या : घरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.

तूळ : आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.

वृश्चिक : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.

धनू : जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.

मकर : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.

कुंभ : सुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.

मीन :  आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास क्रोध येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक करणे शेवटी आर्थिक मिळकत आणि नफा आणते.