शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By

साप्ताहिक भविष्यफल (12 ते 18 जून 2016)

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक गरजेपुरतीच राहील व इतरांकडून येणारा पैसा वेळेवर येईल परंतु विविध कारणास्तव खर्चाचे प्रमाणही तितकेसे वाढेल. त्यामुळे बचत व शिल्लक राहणे शक्यतेच्या पलीकडेच राहील. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. यश समोर दिसू लागेल.
 
वृषभ: सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार पत्र हाती येईल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक आवक मंदावेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील व परिश्रम अधिक वाढतील.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनाविरुद्ध व अनावश्यक खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणे विलंबाखाली राहतील व आर्थिक समस्याचा सामना करावा लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. त्यामुळे मनावरील काळजीचे सावट दूर होऊन उत्साह दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामाबाबत अनुकूल घडामोडी घडतील. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक वाढेल व अचानक धनलाभ संभवतो. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येऊ शकेल. अंतिम चरणात प्रवास नुकसानकारक योग जुळून आणणारी ग्रहस्थिती आहे. त्यामुळे अनोळखीवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक स्वरूपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच उचित व योग्य राहील.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सर्व समस्या मिटतील व उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत अधिकारी वर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहील. त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. अंतिम चरणात मनातील कार्ययोजना प्रत्यक्ष कृतीत येतील व सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील व अपेक्षित असणारे यश मिळेल. मनावरील काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात कार्यक्षेत्रातील आपला दबदबा व वर्चस्व कायम राहील. आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. इतरांचा सल्ला आपल्यासाठी विशेष लाभदायक स्वरूपाचाच सिद्ध होईल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नये व सर्वत्र सावधानता ठेवूनच वाटचाल करणे हितावह स्वरूपाचे ठरू शकेल. इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक राहील. अंतिम चरणात शुभ धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवासयोग जुळून येईल व उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील अपूर्ण योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात इतरांकडून नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. भागीदारीत असणारे वाद मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. सर्वत्र परिस्थिती अनुकूल स्थितीत राहून मनोनुकूल यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे भावी काळाच्या दृष्टीने अहितकारक ठरेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील. विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात दूर होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील व यश मिळेल. अंतिम चरणात इतरांकडून भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व तो स्वीकारावा. भावी काळाच्या दृष्टीने लाभदायक स्वरूपाचाच ठरेल. 
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या आनंदवार्ता हाती येतील व आर्थिक आवक समाधानकारक राहून हातात पैसा खेळता राहील. सर्वत्र अपेक्षेइतके यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. इतरांचे मदतकार्य वेळेवर मिळेल. अंतिम चरणात विरोधक मंडळी आपला कार्यक्रम तूर्त स्थगितीच्या मार्गावर ठेवतील. त्यामुळे आपल्या यशाचा मार्ग खुलाच राहील. मानसिक शांतता व समाधान मिळून काळजीचे सावट मिटेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल व कौटुंबिक सदस्य मंडळी बरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जाणार नाही व यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण परीक्षेबाबतचा निकाल समाधानकारक लागेल. संततीबाबत असणारी चिंता मिटेल. मानसिक शांतता प्रस्थापित राहून यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहून मनोनुकूल यश दृष्टिक्षेपात येईल. कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही व अपूर्ण व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होतील. अंतिम चरणात दूर निवासी प्रियव्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मानसिक सुख-शांती कायम राहील. पारिवारीक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर काही बाबतीत योग्य कारणासाठी खर्च घडेल.