गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By

साप्ताहिक भविष्यफल दि. 19 ते 25 जून 2016

मेष: सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक वाढेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीत राहतील. स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील बहुतेक समस्या मिटतील व व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नोकरीत अधिकारी वर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहून यश मिळेल. अंतिम चरणात मनातील कार्य योजना कार्यान्वित होतील व यशस्वितेच्या मार्गावर राहतील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवास योग घडेल व प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात अपूर्ण व्यवहार पूर्ण होतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. महत्त्वपूर्ण स्वरूपाचे करार-व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. मनावर असलेले दडपण दूर होऊन उत्साह वाढेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात नवीन भागीदारीचा प्रस्ताव येईल व तो जरूर-जरूर करावा. भावी काळासाठी तो उचित व लाभदायक ठरेल. सहकारी वर्ग व बंधू वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहतील. कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायकच ठरू शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही. महत्त्वपूर्ण परीक्षेचा निकाल समाधानकारकरीत्या हाती येईल. जवळचा प्रवासयोग जुळून येईल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा त्रास व ससेमिरा काही प्रमाणात कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहील. 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपातच येतील. काही बाबतीत विरोधक मंडळी गुप्तपणे सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. यशाचा मार्ग मनोनुकूलरीत्या खुला राहील. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय अंतिम निर्णय घेणे अहितकारक ठरू शकेल. इतरांचा सल्ला फक्त ऐकणेच योग्य स्वरूपाचे सिद्ध होऊ शकेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंद वार्ता हाती येईल. हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे सर्व व्यवहार कामे गतिमानरीतीने पूर्ण होऊ शकतील व यश दिसू लागेल. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. आरोग्य व्यवस्थितरीत्या कार्यरत राहील. उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित स्वरूपातच राहू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीच्या मनोनुकूल व चांगल्या वार्ता हाती येतील. काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊ शकेल. अंतिम चरणात संततीबाबत असणार्‍या सर्व प्रकारच्या चिंता व समस्या मिटतील. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत मिळतील. आर्थिक लाभ होईल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवणारी ग्रहस्थिती आहे. अपेक्षेप्रमाणे इतरांकडून सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमानपणे पूर्ण होतील. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येईल. कार्यसभोवतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाऊ शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल. इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन वातावरण उत्साहवर्धक स्थितीतच राहील. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती अनुकूल व चांगली राहून यश समोर दिसेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक आनंद वाढेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहू शकेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास कार्यसाधक ठरेल. अपेक्षित यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक आवक गरजेनुसार राहील. पारिवारिक सदस्य मंडळींच्या आग्रहाखातर काही बाबतीत सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. खर्च करणे अनिवार्य राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च करावा लागेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर स्वरूपाचे ठरेल व होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी सुधारेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होण्याच्या मार्गावर राहील. तातडीच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व परिस्थिती चांगली राहील.

श्री. लक्ष्मण जोशी