गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By
Last Updated : मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (14:32 IST)

धनु राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

धनु राशीच्या लोकांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरु अष्टमस्थानात आहे ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याचबरोबर शनि १२ व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे व्यवस्थापन करताना घाबरून जाऊ नका. तुम्हाला माहीत आहे की, आर्थिक बाबतीत ओढाताण झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी कष्ट करा. ही सर्व स्थिती जुलैनंतर बदलणार आहे. तुम्ही तुमचा आशावाद जागृत ठेवलात तर नवीन वर्ष तुम्हाला आर्थिक भरभराटीचे व उन्नतीचे जाणार हे निश्चित.  
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापारी वर्गाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्न वाढवण्याकरिता काही प्रयोग करून पाहावेसे वाटतील. पण त्यांनी जुलैपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. कामात प्रतिष्ठा मिळेल. स्वप्ने साकारा होतील. आर्थिक सुबत्ता येईल. नवीन व्यवसाय सुरू करणार्‍यांना जुलै 201 5 नंतरचा कालावधी उत्तम आहे. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती नाही त्यात हात घालू नका. 
 
नोकरदार व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीला कठोर परिश्रमाला पर्याय नाही याची जाणीव होईल. नवीन वर्षात नोकरीत बदल करण्याचे विचार मनात येतील. कामात चुकाही होण्याची शक्यता आहे, परंतु आता डोके शांत ठेवलेत व धीर धरलात तर सर्व काही ठीक राहील. परदेशी जाण्याची संधी ऑक्टोबरमध्ये मिळेल. जे काम पूर्वी वाया गेले असे वाटत होते त्याचा कुठे ना कुठे तरी उपयोग झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. 
 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक सुखात थोडीफार कमतरता राहील. पण तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसेल. पूर्वी जर नवीन वास्तू किंवा मोठ्या वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरले असतील तर त्यात एखादा निर्णय बदलणे भाग पडेल. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबियांचा वागणुकीतही बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. या बदलामुळे तुम्ही व्यथित होऊ शकता. प्रत्येक दृष्टिकोनातून तुम्हाला खंबीर करायचे, असे या वर्षाने मनावर घेतल्यासारखे वाटते. तुमच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल, त्याचा तुमच्या प्रकृतीवरही परिणाम होईल. प्रेमप्रकरणांमध्येही फारसे समाधान लाभणार नाही. पण लक्षात ठेवा, जे होते, ते चांगल्यासाठीच होते. शुभकार्य 
जूननंतर ठरेल आणि सप्टेंबर नंतर पार पडेल. सामूहिक क्षेत्रात जुलै 2015 नंतर यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी बरेच कष्ट झेलावे लागतील. 
 
शुभ रंग : करडा  
शुभरत्न : पाचू       
आराध्यदैवत : कृष्ण          
उपाय: देवळात तूप आणि बटाटा दान करा.