गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By
Last Updated : बुधवार, 17 डिसेंबर 2014 (16:00 IST)

वर्ष 2015मध्ये मुलांकानुसार फलादेश

वर्ष 2015च्या अंकांची बेरीज केली तर 2+0+1+5= 8 येते. अर्थात 2015 हे मुलांक 8 आहे. म्हणून या मुलांकाचे व इतर मुलांक असणार्‍या व्यक्तींना येणारे वर्ष कसे जाईल, हे आता आपण पहाणार आहोत. 
मुलांक 1 : दिनांक 1, 10, 19 व 28 तारखेला जन्म घेणार्‍या लोकांना या वर्षात फार श्रम करावा लागणार आहे. महत्त्वाकाक्षांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आत्मस्तृती करणे टाळावे. सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरु अथवा वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. शुभ वार्ता कळतील. अपूर्‍या कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असेल. कौटुंबिक बाबतीत महत्त्वपूर्ण कार्य घडतील. अविवाहितांचे विवाहाचे योग बनत आहे. नोकरधार्‍यासांठी हा काळ उत्तम आहे. रविवार व सोमवारी व 1, 10, 19 व 28, 7 तारखांना शुभ कार्य केल्याने लाभ मिळेल.    
 
उपाय- सूर्याला पाण्याचा अर्घ्य देऊन गायत्री मंत्र व सूर्याच्या एखाद्या मंत्राचा जप करावा.
पुढे पहा मूलक 2 
मुलांक 2 : मूलक 2चा स्वामी चंद्र आहे त्यामुळे वर्षाच्या प्रारंभी अडचणी सोडवाव्या लागतील. दिनांक 2, 11, 20 व 29ला जन्म घेणार्‍या लोकांसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. काळजीपूर्वक कामे करा. शक्यतो, महत्त्वाचे कामे पुढे ढकलण्यास हरकत नाही. डोळे झाकून कुठल्याही कागदावर सह्या करू नका. एखाद्या नवीन कार्याच्या योजनेची सुरुवात करण्याअगोदर मोठ्याचा सल्ला नक्की घ्या. व्यापार-व्यवसायातील स्थिती ठीक-ठीक असेल. आरोग्याच्या दृष्टीने सांभाळून चाला. मित्रता, प्रेमासाठी 1 व 7 मूलांक असणारे लोकं अनुकूल असतील. रविवार व सोमवारी शुभ कार्य करावे.

उपाय- सोमवारचा उपास करावा.   
पुढे पहा मुलांक 3चे भविष्यफल... 
मुलांक 3  
मूलक 3चा स्वामी गुरु असल्यामुळे दिनांक 3, 12, 21 व 30ला जन्म घेणार्‍या जातकांसाठी हा वर्ष कष्टदायक ठरणार असला तरी कुटुंबात मंगलकार्य जुळतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखदायक ठरणार आहे. एखाद्या विशेष परीक्षेत यश मिळू शकते. नोकरधार्‍यांना उत्तम यश मिळेल. नवीन उद्योग धंद्याची योजना बनू शकते. दांपत्य जीवनात सुखद स्थिती असेल. घरात किंवा कुटुंबात शुभ कार्य घडतील. मित्रांचा साथ सुखद राहील.  प्रेम, मित्रता इत्यादीमध्ये 3-6-9 मूलांकचे जातक शुभ राहतील. गुरुवार, शुक्रवार व मंगळवारी शुभ कार्य करावे. 

उपाय- पुष्कराज (टोपाझ) व एमेथिस्ट धारण करणे शुभ असेल.
पुढे पहा मुलांक 4 असणार्‍या लोकांचे भविष्यफल ...
मुलांक 4  
मूलक 4चा स्वामी राहू आहे तसेच वर्षाचा मूलक 6 आहे. दिनांक 4, 13, 22 व 31ला जन्म घेणार्‍या लोकांसाठी हे वर्ष फारच आनंददायक ठरणार आहे. मनासारखे प्रमोशन व परिवर्तन होत असला तरी विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायातील व्यवहार बिघडणार नाही, याची काळजी घ्या. कौटुंबिक बाबतीत सहयोग मिळाल्याने यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल, तसेच मित्र वर्गाचा सहयोग मिळेल. नवीन व्यवसायाची योजना प्रभावी होण्यापर्यंत गुप्तता राखणे आवश्यक आहे. शत्रू पक्षावर प्रभावपूर्ण यश मिळेल. नोकरधारकांनी प्रयत्न केल्यास त्यांना यश नक्की मिळेल. विवाह, प्रेम व मैत्रीसाठी 1-2-7-8 मूलांक असणारे जातक अनुकूल ठरतील.   सोमवार, शनिवार, रविवारी शुभ कार्य करावे. 


उपाय-  'ॐ गं गणपतये नम:'चा जप करावा व गणेश चतुर्थीचा उपास केल्याने अडचणी कमी होण्यास मदत मिळेल.  
 पुढे पहा मुलांक 5 असणार्‍या लोकांचे भविष्यफल..  
मुलांक 5 
मूलक 5चा स्वामी बुध आहे त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. दिनांक 5, 14 व 23 तारखेला जन्म घेणार्‍या लोकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. अनुभवाचा चांगला उपयोग करून घेता येईल. आतापर्यंत येत असलेल्या अडचणीदेखील या वर्षी दूर होतील. पारिवारिक प्रसन्नता राहील. संतानं पक्षाकडून आनंदाची बातमी कळेल. नोकरीवर्ग व्यक्तींसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. दांपत्य जीवनात मधुर वातावरण राहील. अविवाहित विवाहाच्या बंधनात अडकतील. विवाह व प्रेमाच्या दृष्टीने मूलांक 5 वाले व्यक्ती अनुकूल असतील. सोमवार, बुधवार तथा शुक्रवारी शुभ कार्य करावे.   
 
उपाय- देवी लक्ष्मीची पूजा करावी. रविवार व पौर्णिमाचे उपास केल्याने कष्ट कमी होण्यास मदत मिळेल. 
 
पुढे पहा मुलांक 6 असणार्‍या लोकांचे भविष्यफल..
मुलांक 6  
मूलक 6चा स्वामी शुक्र असल्यामुळे मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. दिनांक 6, 15 व 24ला जन्म झालेल्या लोकांसाठी हे वर्ष अनुकूलता देणारा असेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. व्यापार-व्यवसायात यश मिळेल. विवाहाचे प्रबळ योग आहे. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळाल्याने प्रसन्नता राहील. नोकरीधारक व्यक्ती आपल्या श्रमाच्या बळावर उन्नतीचे हक्कदार असतील. बँकेच्या परीक्षांमध्ये देखील यश मिळेल. मन प्रसन्न राहील. 3-6-9 मूलांक व्यक्ति तुमच्यासाठी अनुकूल असतील. मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी शुभ कार्य करावे.  
 
उपाय- शुक्रवारी देवीची पूजा व उपास केल्याने कष्ट कमी होतील. 
 
पुढे पहा मुलांक 7 असणार्‍या लोकांचे भविष्यफल..
मुलांक 7   

मूलक 7चा स्वामी केतू असल्यामुळे प्रवास योग संभवतो. कलाकारांना यश मिळेल. सामाजिक कार्य प्रतिष्ठा मिळवून देईल. व्यापार-व्यवसायातील स्थिती उत्तम राहील. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल. नोकरीधारक व्यक्तींसाठी वेळ सुखकर राहील. नवीन कार्य-योजनेची सुरुवात करण्याअगोदर केशराचा तिलक लावावा. आर्थिक योग उत्तम राहील. विवाह व प्रेमाच्या दृष्टीने 1-2-4-7 अंकांचे   समायोजन शुभ ठरतील. रविवार व सोमवारी शुभ कार्यास प्रारंभ करावा. पांढरा, हिरवा, हलका निळा रंग अनुकूल ठरेल.  


उपाय- मंगळवारचा उपास व नृसिंहची उपासना केल्याने कष्ट कमी होतील. 
 
पुढे पहा मुलांक 8 असणार्‍या लोकांचे भविष्यफल.. 
मुलांक 8

मूलक 8चा स्वामी शनी आहे म्हणूनच तुम्हाला प्रत्येकाशी संयमाने वागावे लागेल. दिनांक 8, 17 व 26ला जन्म असणार्‍या लोकांसाठी हे वर्ष सुख-समृद्धि व यश देणारे ठरतील. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. जे आतापर्यंत बाधित होत आहे ते ही सफल होतील. व्यापार-व्यवसायातील स्थिती उत्तम राहील. नोकरीपेशा व्यक्ती प्रगती करतील. बेरोजगारांनी जर प्रयत्न केला, तर नक्की रोजगार मिळेल. शत्रू वर्ग प्रभावहीन होतील, आरोग्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. धार्मिक भावना वाढेल. शनिवार शुभ दिवस आहे, म्हणून या दिवशी शुभ कार्यास प्रारंभ करावा. 


उपाय- शनिची उपासना व उपास केल्याने कष्ट कमी होतील. 
 
पुढे पहा मुलांक 9 असणार्‍या लोकांचे भविष्यफल 
मुलांक 9  

दिनांक 9, 18 व 27चा जन्म असणार्‍या लोकांसाठी हे वर्ष चढ-उतारीचे राहणार आहे. मूलक 9चा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. नव्या योजना कार्यान्वित करण्‍यास चांगला काळ. हे सम आहे म्हणून तुम्ही तुमच्या शक्तीचा सदुपयोग करून प्रगतीकडे वाटचाल कराल. पारिवारिक विवाद दूर होतील. महत्त्वपूर्ण कार्य योजनांमध्ये यश मिळेल. अधिकार क्षेत्रात वृद्धी संभव आहे. नोकरीत येणारी बाधा दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. राजकारणातील व्यक्तींना यश मिळू शकतो. मित्रमंडळ व कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. अनुकूल व्यक्ति 3-6-9 मूलांकवाले असतील. शुभ दिवस मंगळवार, गुरुवार व शुक्रवार आहे.   
 
उपाय- मारुतीची पूजा व मंगळवारचा उपास केल्याने कष्ट कमी होण्यास मदत मिळेल.  
 
टिप : प्रतिकूलता असल्यास गाय व गुरुची सेवा, अन्नदान, देवळात जाणे, अध्ययन सामग्री दान करणे व केळीची पूजा केल्याने यश मिळेल.