Widgets Magazine
Widgets Magazine

पाने झाडाची

सौ. रश्मी गुजराथी

tree
वेबदुनिया|

ND
लाल जांभळे, पान कोवळे,
पालव आंब्यांचे
झाडावर तुरे पानांचे
करती स्वागत चैत्राचे

नागवेलीचे पान विड्याचे
पूजेत मानाचे,
पूजेसाठी ताम्हनात,
मान तुळशीचे,

दारावर तोरणात, शोभते पान आंब्याचे,
पान केळीचे पाहता,
सूर आठवती सनईच

आकार सुंदर, नाजूक तळवा,
पान पिंपळाचे,
खूण वहीत, पान जुने,
बालपणीच्या आठवणींचे


यावर अधिक वाचा :