testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वृद्धत्व दुसरे बालपण

डॉ. गुणवंत चिखलीकर

poem
वेबदुनिया|

WD
आठवते अजुनी, माझे बालपण मला
आई म्हणायची भारी हट्टी आहे मेला ।
आज ही म्हणते, काय म्हणावे या हट्टीपणाला
वाटे परतुनी भेटले, माजे बालपण मला ।।1।।
बाबा म्हणायचे, लागा जरा अभ्यासाला
पत्नी आज म्हणते, जरा लागा देवपूजेला।
पूर्वी ही‍ नव्हता, आजपण नाही वेळ देवधर्माला
वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला ।।2।। बाबा सांगत होते, रोज परवचा म्हणायला
आता नातू म्हणतो, शिका संगणकाला।
पूर्वीही आवडे, आता पण आवडते गप्पा मारायला
वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला।।3।।
आजीचे बोट धरून जात होतो जत्रेला
आज नातू नेतो फीर हेराफेरीला।
पूर्वी आणि आताही आवडे गोडधोड खायलावाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला।।4।।


संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :