बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)

हुशार कोंबडा आणि लबाड कोल्हा

एका घनदाट जंगलात एका झाडा वर एक कोंबडा राहायचा. दररोज तो सूर्योदय होण्याच्या पूर्वी उठायचा. उठल्यावर अन्नाच्या शोधात बाहेर पडायचा आणि संध्याकाळच्या आत परत यायचा. त्या जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता. त्या कोंबड्याला बघून तो विचार करायचा की किती छान गुबगुबीत कोंबडा आहे माझ्या हाती लागल्यावर किती मस्त जेवण होईल, परंतु  तो कोंबडा खूप हुशार होता. तो त्याच्या हाती लागतच नव्हता.  
एके दिवशी त्या कोल्ह्याने त्या कोंबड्याला पकडण्यासाठी एक युक्ती केली. तो त्या झाडा जवळ गेला आणि कोंबड्याला म्हणाला, " अरे कोंबड्या भाऊ! ऐकले का तुम्हाला मिळाली की नाही  आनंदाची बातमी? जंगलाचा राजा सिंहाने आणि सगळ्या वडिलधाऱ्याने मिळून आता सर्वानी आपसातले वैर कायमचे संपवून हिळुन-मिसळून राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि सांगितले आहे की  आजपासून एक ही प्राणी एकमेकांचा शिकार करणार नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा देणार नाही. असे केल्यास त्याला दंड देण्यात येईल. "चला आपण आनंद साजरा करू या. एकमेकांना मिठी मारू या. "     
कोल्ह्याची गोष्ट ऐकून कोंबडा म्हणाला" अरे वा ही तर खरोखर आनंदाची बातमी आहे. म्हणूनच मागून ते दोघे शिकारी कुत्रे देखील आपल्याला गळाभेट देण्यासाठी येत आहे. "
 
कोल्ह्याने आश्चर्याने विचारले " मित्र? कोण मित्र? कोंबडा म्हणाला की  अरे तर शिकारी कुत्रे देखील आपलेच मित्र झाले न आता? " 
शिकारी कुत्र्यांचे नाव घेतातच कोल्ह्याने घाबरून पळ काढला. आणि मागे वळून देखील बघितले नाही.  
 
कोंबड्याने हसून कोल्ह्याला विचारले अरेरे, मित्रा कोठे पळत आहे? तूच म्हणाला की आतापासून आपण मित्र आहोत? होय मित्रतर आहोत पण कदाचित हे त्या शिकारी कुत्र्यांना समजले नसावे. असं म्हणत त्याने धूमपळ ठोकली. अशा प्रकारे कोंबड्याच्या हुशारीने कोंबड्याचे प्राण वाचले.  
 
तात्पर्य -  
कोणाच्याही बोलण्यावर सहजपणे विश्वास ठेवू नये आणि धूर्त लोकांपासून सावध राहावे.