गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

सत्य कदाचित वेगळं असू शकतं

एक 25 वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील रेल्वेने प्रवास करत असतात. त्यांच्या समोर एक जोडपं बसलेलं असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो, "बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत. "  त्याचे बाबा त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसतात. तो पुन्हा ओरडतो, "बाबा ते बघा घरी कशी पळताना दिसत आहे". हे ऐकूनही त्याचे बाबा त्याला कौतुकाने बघतात.
 
हा प्रकार बघून समोर बसलेल्या जोडप्याला नवल वाटतं. हे काय एवढा तरुण मुलगा दिसायला तर अगदी भला चांगला आहे पण असे हे लहान मुलासारखा वागतोय. तेवढ्यात तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ओरडतो. "बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत. "  आता मात्र समोर बसलेल्या जोडप्याला राहवतं नाही आणि त्यातून नवरा म्हणतो त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो. ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का दाखवत नाही.? "
 
वडील हसतात आणि म्हणतात, "आम्ही आताच डॉक्टरांकडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले. ”
 
हे ऐकल्यावर त्या जोडप्याला स्वत:त्या विचारांची लाज वाटू लागते आणि ते क्षमा मागतात.
 
तात्पर्य: कुणाबद्दलही घाईत आणि विचार न करता निर्णय घेऊ नये. सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते.