गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

माणसाने संधी ओळखावी

एकदा एका गावात पूर येतो. लोकं गावातून पळ काढाल लागतात. तेव्हा मंदिराच्या पुजार्‍यालाही लोकं आपल्यासोबत यायला सांगतात. त्यांचा आग्रह पुजारी नाकारतो. पुजारी म्हणतो, की त्याच्या देवावर पूर्ण विश्वास आहे आणि देव त्याचं नक्कीच रक्षण करेल.
 
थोड्या वेळातच पाणी वाढायला लागतं आणि गाव वाहू लागतो. तेव्हा तिथून जात असलेली होडीतील माणसं पुजार्‍याला हाक मारून त्यात बसण्याचा आग्रह करता. तेव्हाही पुजारी नाकारतो आणि म्हणतो आजपर्यंत मी देवाची मनापासून भक्ती केली आहे म्हणून तोच माझं यापासून रक्षण करेल.
थोड्या वेळाने एका पट्टीचा पोहणारा माणूस पुजार्‍याला बघून म्हणतो या माझा पाठीवर मी तुम्हाला पलीकडे नेतो. त्यासोबत ही पुजारी जात नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येऊन पुजार्‍याकडे शिडी टाकतो, तेला ही पुजारी नाकारतो. 
 
अखेर पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व पुजारी मरण पावतो. पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे तो सरळ स्वर्गात जातो. तिथे त्याला देव भेटतात आणि त्यांना बघितल्याक्षणी तो तक्रार करतो की मी आपला एवढा मोठा भक्त असूनही आपण माले वाचवले नाही. 
 
ते हे संभाषण ऐकून देव हसून म्हणतो, " मी तुझ्यासाठी, एक होडी, एक पोहणारा माणूस आणि हेलिकॉप्टरदेखील पाठवले तरी तू त्या संधीचा फायदा घेतला नाहीस. तू आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या. हे ऐकून पुजार्‍याला आपली चूक कळली की हे सर्व त्याच्यासाठी साक्षात भगवंताने पाठवले होते आणि त्याने सर्वांना नाकारले.
 
अर्थातच आयुष्यात असंख्य संधी येत असतात. एक लहानशी संधीदेखील आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी हातातून जाता कामा नये.