गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

नुसते पुस्तकी ज्ञान कामाचे नाही

एका गावात चार मित्र होते. त्यातून तीन हे अनेक विद्यांत पारंगत होते परंतू चौथा मात्र अल्पशिक्षित होता. तो अल्पशिक्षित असूनही व्यावहारिक होता. त्यात विचारबुद्धी चौघांत जास्त होती.
 
एकदा ते चौघं प्रवासावर निघाले. तिघे विद्वान मित्र चौथ्याची निर्भर्त्सना करू लागले की तू अडाणी आमच्यासोबत येऊन काय करशील. तरी तो मित्रांच्या बोलण्याचे मनावर काय घेयचे हा विचार करत त्यांच्यासह निघाला.
 
चालता- चालता ते एका रानावाटेने जाऊ लागले असता त्यांना एके ठिकाणी सिंहाची हाडे पडलेली दिसली. ती पाहून एक म्हणाला आता आपल्या विद्येचे सामर्थ्य सिद्ध करून दाखविण्याची चांगलीच संधी दिसत आहे. असे बोलून त्याने आपल्या विद्येच्या साहाय्याने हाडे सांधून अखंड सांगाडा बनविला. 
 
दुसर्‍याने स्वत:चे सामर्थ्य दाखवत सांगाड्यात मांस व रक्त घालून प्राणहीन सिंह बनविला. 
 
आता तिसर्‍या म्हणाला मी मंत्रविद्येने या प्राणहीन प्राण्यात प्राण ओतेन. तेवढ्यात चौथा काहीसा अडाणी म्हणाला, अरे असे करणे आपल्याच प्राणावर बितेल. कारण तुझ्या हुशारीने तो सिंह जिवंत झाला तर आपणा चौघांनाही फाडून खाणार. पण तिसरा म्हणाला या दोघांनी आपली विद्या दाखवली आता मी आपली विद्ववता दाखवण्यात मागे सरकणार नाही. त्याची जिद्द बघून चौथा झाडावर जाऊन बसला. 
 
तिसर्‍याने मंत्रविद्येने सिंह जिवंत केला आणि चौथ्याच्या बोलण्याप्रमाणेच प्राण संचारल्यावर त्या सिंहाने तिघांना फाडून खाल्ले. तृप्त झालेला जेव्हा तिथून निघून गेला तेव्हा चौथा खाली उतरून घरी निघून गेला.
 
तात्पर्य: नुसते पुस्तकी ज्ञान कामी येत नाही त्यासोबत सारासार विचाराची जोड हवी.