मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:09 IST)

अस्वल आणि दोन मित्र

दोन मित्र जंगलातून चालले होते. त्यांना लांबून एक अस्वल त्यांच्या दिशेने येताना दिसला. ते घाबरले, पहिला मित्र जो अशक्त होता तो जवळच्या झाडावर चढून बसला. 
 
पण दुसरा मित्र अंगाने भारदस्त असल्यामुळे झाडावर चढू शकण्यास सक्षम नव्हता. त्याने बुद्धी वापरून एक युक्ती केली. तो जमिनीवर श्वास रोखून झोपला.
 
काही वेळानंतर अस्वल तेथे आले आणि निजलेल्या मित्राच्या जवळ येऊन त्याचा वास घेतला आणि पुढे निघून गेला. अशा प्रकारे त्या जाड मित्राचे प्राण वाचले. नंतर त्याचा मित्र जो झाडावर चढून बसलेला असतो त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो मित्रा, मगाशी त्या अस्वलाने तुझ कानात येऊन काय सांगितले? त्या मित्राने सांगितले अस्वल म्हणाला, नेहमी अशा लोकांना मित्र बनवा जो अडचणीत आपली साथ कधीही सोडत नाही.
 
तात्पर्य - या कहाणीपासून शिकवण मि‍ळते की नेहमी असे मित्रा बनवा जो संकटातदेखील कामी येतो.